loader

संजय भाकरे फाउंडेशन नागपूर

शहराच्या, वार्डाच्या विकासाच्या गप्पा सर्वच राजकीय पक्ष मारतात. घोषणा करतात. पण, आता घोषणा नको, प्रत्यक्ष कृती हवी आहे, असे सांगण्याची वेळ आली आहे. आता "ऑन लाईन"चा जमाना आला आहे. घरबसल्या आपल्या "लॅपटॉप" व "मोबाईल"वर वॉर्डातील नगरसेवकाच्या कार्य -कर्तृत्वाची माहिती ऑनलाईन वेबसाईटवर जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आपला नगरसेवक कार्यात स्मार्ट असावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. म्हणूनच "नॅशनल वेब मीडिया" वर प्रत्येक नगरसेवक आपल्या कार्याचा आढावा सादर करणार आहे. वॉर्डातील विकासात्मक कामाची सविस्तर माहिती देण्यासाठी "नॅशनल वेब मीडिया" वर भेट देणार आहे. आपणही केवळ एका "क्लिक"वर ही माहिती जाणून घेऊ शकता.

त्यामुळे शहराला "स्मार्ट" करायचे असेल, तर नगरसेवकही "स्मार्ट" असायला हवा. कचऱ्यामुळे वाढलेली रोगराई, रस्त्यावरील खड्डे, फुटपाथ वर झालेले अतिक्रमण, व्यापार हब होण्याऐवजी बाहेर जाणारे उद्योग -व्यापार, पालिकांच्या शाळांची आणि रुग्णालयांची दुरवस्था यासारख्या अनेक समस्यांकडे नगरसेवकांचे कितपत लक्ष आहे किंवा ते याबाबत कितपत जागृत आहेत हे जाणून घेण्यासाठी "नॅशनल वेब मीडिया" मदतीसाठी येत आहे. आपण फक्त "नॅशनल वेब मीडिया"च्या "www.nationalwebmedia.com"वर क्लिक करा.